‘नावीन्याची क्षमता अभियंत्यांनी समजून घेतली पाहिजे. सर्वच क्षेत्रांतील घडामोडी जाणून काळाचा वेध घेतला पाहिजे. नावीन्यपूर्ण उत्पादनांचा विकास करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन इंद्रदीप ऑटोचे मॅनेजिंग पार्टनर देवेंद्र दिवाण यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना रोप भेट देण्यात आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे म्हणाले, “इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आज “देश परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. व्यवसायाबरोबरच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.’ संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी प्रास्ताविकात भविष्यातील योजनांची माहिती सांगितली. प्राचार्य सुहास प यांनी ‘आउट कम बेस्ड एज्युकेशन’ या विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य डॉ. विशाल पोवार, रजिस्ट्रार अमित आव्हाड, प्रा. रोहन पाटील, प्रा. हेमंत शिंदे, उपस्थित होते. संस्थेचें कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. अशोक कोळेकर, प्रा. आरती चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुदर्शन महाडिक यांनी आभार मानले.
प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत कार्यक्रम(Students Induction & Welcome Programme 2024-25)
