Skip to content
Menu
Menu
फ्रेशर्स पार्टी आणि दांडिया फेस्ट 2k24

कोल्हापूर: बापूजी साळुंखे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (BSIET) येथे प्रथम वर्षाच्या बी.टेक विद्यार्थ्यांसाठी भव्य फ्रेशर्स पार्टी आणि दांडिया फेस्ट 2k24 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद संस्थेचे सीईओ श्री. कौस्तुभ गवाडे, BSIET चे संचालक प्रा. विरेन भिर्डी, प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, कार्यक्रम समन्वयक प्रा. स्वानंद कदम, विद्यार्थी कल्याण विभाग अधिष्ठाता प्रा.संगीता इंगवले, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. गीता सालोखे आणि प्रथम वर्ष विभागाचे विभागप्रमुख प्रा. रोहन पाटील या मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध सोशल मीडिया प्रभावक आणि इंस्टाग्राम स्टार श्री. अथर्व राऊत यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण आणि संस्थेची प्रार्थना करून करण्यात आली. उद्घाटन करताना श्री. कौस्तुभ गवाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांनी कॉलेज जीवनाचा आनंद घ्या आणि त्याचबरोबर शैक्षणिक प्रगतीवर देखील लक्ष केंद्रित करा, असा संदेश दिला. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि नवरात्र उत्सवाचे महत्त्व सांगत नारी शक्ती आणि नारी सन्मान या मूल्यांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. अथर्व राऊत यांनी विद्यार्थ्यांना आपली आवड व स्वप्ने यांचा पाठपुरावा करण्याचा सल्ला दिला. प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी विशेष कौशल्य असते आणि त्याचा विकास केल्यास यशस्वी होता येते, असा त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सिझान माद्रे यांनी केले आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. अशोक कोळेकर यांनी करून दिली. कु. सिद्धी लाड यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
फ्रेशर्स पार्टी आणि दांडिया फेस्ट 2k24 हा BSIET च्या विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय सोहळा ठरला, ज्यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक उत्सवांची सांगड घालत विद्यार्थ्यांना आनंदाने आणि स्मरणीय आठवणींनी परिपूर्ण सुरुवात करण्याची संधी मिळाली.