Skip to content
Menu
Menu
Welcome Function & Induction Program (24-09-2024)
September 24, 2024

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा ‘स्वागत समारंभ’ (Welcome Function & Induction Program) मंगळवार, दिनांक 24/09/2024 रोजी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन या ठिकाणी अगदी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. देवेंद्र दिवाण यांनी ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्य क्षमता ‘ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इन्स्टिट्यूटतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या 600 हून अधिक विद्यार्थ्यांना रोप भेट देण्यात आले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांना मानवी मूल्ये आणि रोजगार निर्मिती या अनुषंगाने अभियांत्रिकी शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्रा. विरेन भिर्डी यांनी प्रास्ताविक केले. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी ‘आउट कम बेस्ड एज्युकेशन’ विषयावर विचार मांडले. सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक याप्रसंगी उपस्थित होते.